विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
(स्रोत: हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा, अनंत भालेराव)
मराठवाड्यातील सीमावर्ती कॅम्पस् व तेथील प्रमुख कचेऱ्या:
(१) मुंबई : मध्यवर्ती कचेरी
प्रमुख : भाऊसाहेब वैशंपायन, आ. कृ. वाघमारे, ललित मोहन वकील, अनंत भालेराव, (फेब्रुवारी ४८ नंतर) नारायणराव लोहारेकर, सो. ना. कुलकर्णी, भी. ल. परतूडकर, पद्माकर लाटकर, शंकरलाल पटेल.
(२) मनमाड : प्रांतिक कचेरी (मराठवाडा)
प्रमुख : श्रीनिवास बोरीकर, सखाराम मंडलिक, अच्युतराव खोडवे, (नंतर हे दोघे इंदूरला गेले) दाबके.
(३) नागपूर : शस्त्रास्त्र खरेदी केंद्र. सीताराम किशनराव पप्पू, दासराव मोहनपूरकर
(४) बंगलूर : (शस्त्र खरेदी) प्रमुख रामचंद्रराव नांदापूरकर नागनाथ परांजपे, नारायण चाकूरकर, विठ्ठलराव पवार
(५) इंदूर : (शस्त्र खरेदी) प्रमुख अच्युत खोडवे, सखाराम मंडलिक.
(६) पुणे : (शस्त्र खरेदी) प्रमुख : बाबासाहेब परांजपे, व्यासाचार्य संदीकर, बळवंत नागणे, रा. ज. देशमुख, अनंतराव कुलकर्णी, विश्वंभरराव हराळकर.
(७) सोलापूर : (शस्त्र खरेदी) प्रमुख बाबासाहेब परांजपे, व्यासाचार्य, नागणे, विश्वंभरराव हराळकर
जिल्हा कचेऱ्या:
(१) सोलापूर : (उस्मानाबाद - लातूर जिल्हा) फुलचंद गांधी, राघवेंद्रराव दिवाण.
(२) मनमाड : (औरंगाबाद - जालना जिल्हा)
माणिकचंद पहाडे, लाला बिंदाप्रसाद, मनोहर सोनदे, पंढरीनाथ तत्सत.
(३) नगर : (बीड जिल्हा) प्रमुख : रतनलाल कोटेचा, वामनराव वझे, काशीनाथ जाधव.
(४) वाशिम : (परभणी जिल्हा) प्रमुख : विनायकराव चारठाणकर, दादासाहेब चारठाणकर, गंगाप्रसाद अग्रवाल, जे. एन्. शर्मन, शंकरलाल सेठी, गोविंद बापूराव देशमुख, रामचंद्र टाक, सखारामपंत नाभ्रेकर, विठ्ठलराव देशपांडे परतूर.
(५) उमरखेड : (नांदेड जिल्हा) प्रमुख : भगवानराव गांजवे, श्यामराव बोधनकर, (जाने. अखेर). गोपाळशास्त्री देव, अनंत भालेराव (जानेवारी अखेरपर्यंत), रघुनाथ रांजणीकर, नागनाथ परांजपे (जानेवारी अखेरपर्यंत)
उस्मानाबाद जिल्हा (लातूर)
(१) सोलापूर : वरीलप्रमाणे
(२) बार्शी : प्रमुख : शेषराव वाघमारे, चंद्रशेखर वाजपेयी, लक्ष्मणराव चाकूरकर, भगवानराव अंबेगावकर, किशनराव शिरसीकर.
(३) गौडगाव : रामभाऊ रंगनाथ जाधव (प्रमुख), नरहरराव मालखरे, राजेंद्र देशमुख, वसंत अंबादास देशमुख, दत्तात्रय गणेश, मनोहर टापरे, भगवान तोडकरी.
(४) चिंचोली : प्रमुख : रामचंद्रजी मंत्री (पुढे बार्शी व चिंचोली कॅम्प एकत्र करण्यात आले) श्रीधर वर्तक, बापूसाहेब वाघमारे, अमृतराव मास्तर, साळुंके गुरुजी.
(५) वाघोली :
(६) अंबाजवळगा : (गौडगाव व चिंचोली या कॅम्प्सच्या तहत असलेली उपकेंद्रे)
(७) कौडगाव :
(८) वाघदरी : शाहूराव जाधव (प्रमुख)
(९) मुस्ती : श्रीनिवास गोविंदाचार्य अहंकारी (प्रमुख), नानासाहेब चिंचोलीकर वकील, राम माधव गायकवाड.
(१०) पानगाव : ज्ञानोबा पाटील इर्लेकर (प्रमुख), रामराव ज्ञानोबा आवरगावकर, दत्तोबा भोसले, नरसिंगराव देशमुख काटीकर, उद्धवराव पाटील, बाळासाहेब पाटील.
कॅम्पस् :
नांदेड जिल्हा
उमरखेड : (जिल्हा केंद्रांत दिलेली नावे सोडून)
साहेबराव देशमुख, आबासाहेब देशमुख, राजाराम देशमुख, बन्सीलाल तोष्णीवाल, किशोर शहाणे, भीमराव देशमुख, जयवंतराव वायपनेकर, नागोराव थेरबनकर, अमृतराव थेरबनकर, बाबूराव कुंटूरकर, धनराज पुरोहित, शंकरलाल शर्मा, दिगंबर उत्तरवार, काशीनाथ शेट्टी, मोहन शर्मा, प्रेमराज यादव, जगदीश, मल्लिकार्जुन बर्डे, भीमराव लहानकर, रंगराव बारडकर, यादवराव मास्तर, नामदेवराव, माधवराव वायपनेकर, जानकीलाल राठी, लाखासिंग लमाणी, तुकाराम कंजारकर आणि शंकरराव चव्हाण.
परभणी जिल्हा
(१) वाशिम :
जिल्हा कचेऱ्यांच्या यादीत दिल्याप्रमाणे
(२) लोणी : प्रमुख वसंतराव चौधरी, किशनराव चारठाणकर, मनोहर कुलकर्णी, जयकृष्ण भालेराव, प्रभाकर वाईकर, द. रा. मेढेकर, आनंदराव कौसडीकर, विष्णुपंत सेवलीकर.
(३) व्याड : प्रमुख बाबूराव जामकर, डॉ. बाबुराव देशपांडे, चंद्रकांत पाटील, विष्णू अहीरवाडकर, भगवानराव खोडवे.
(४) धानोरा : नागोबा दारेवार (प्रमुख) बहिर्जी, वापटीकर, बापूराव वापटीकर, नागोबा राजाराम आलसटवार, नारायण पुंजाजी जावळे मास्तर, शंकरराव कन्नेवार, बाळाजी भगवान जोशी.
(५) शेबाळ पिंपरी : (दिपाजी पाटील)
पुरभाजी पाटील (गऊळकर), अण्णाराव टाकळगव्हाणकर, उत्तमराव वाकोडीकर, विठ्ठलराव नाईक, श्रीधरराव देशमुख, मोहनराव देशमुख, कोंडबा पाटील, दरोडेकर.
औरंगाबाद जिल्हा (जालना)
(१) मनमाड : प्रमुख : माणिकचंद पहाडे, मिश्रीलाल पहाडे, नाना जेधे, मुरलीधर कानडे. (२) देऊळगाव राजा (जालना): मनोहर सोनदे, हनुमंत बेंडे, रामराव गुंजकर, नागोराव पाठक, जनार्दन मामा नागापूरकर.
(३) साडेगाव (अंबड) : प्रमुख : विठ्ठलराव राधाकृष्ण जोशी, राघवेंद्र देशपांडे, पंढरीनाथ तत्सत, लक्ष्मणराव देशमुख, बापूसाहेब देशमुख, रामसिंग चव्हाण, भाऊराव वैद्य, गोविंद तारोपंत कुलकर्णी. (४) कोलता टाकळी : प्रमुख : बाबुराव जाधव, लाला लक्ष्मीनारायण, डॉ. अंबादास धामणगावकर, संपत भिल्ल, सौ. दगडाबाई शेळके, बन्सी काका. (औरंगाबाद)
(५) पातोडा (कन्नड) : प्रमुख : काकासाहेब देशमुख, भिकाजी चौधरी, रामसिंग भावसिंग घोरपडे, देवराम रामजी पाटील (चाळीसगाव), त्र्यंबक गोपाळ शिंपी. (६) शेंदर्णी (सिल्लोड) प्रमुख होनसिंग हजारी, कन्हैय्यासिंग हजारी, विठ्ठलराव काशिराम देसाई, शिवराम खंडेराव देशमुख, भिकन संपत जाधव.
(७) सुरेगाव (वैजापूर) : मतसागर, रतिलाल जरीवाला, कमलाकर देशपांडे. रावसाहेब मतसागर, गोपाळ प्रमुख : विश्वनाथ भागाजी मास्तर, शिवराम आसराजी सामणगावकर.
(८) एरंडगाव (पैठण): प्रमुख काशीनाथ प्रल्हाद कुलकर्णी, दिगंबरराव नारायणराव कुलकर्णी, रामनाथ श्रोत्रीय, तात्यासाहेब महाजन.
(९) टोका (गंगापूर) : प्रमुख लक्ष्मण यशवंता पाटील. रामगोपाल रामकिशन नावंदर, आसाराम कुमावत,
(१०) गोवर्धन सराळा : विजयेंद्र काबरा, अमृत गडकरी.
(११) औरंगाबाद शहर प्रमुख काशीनाथ नावंदर, अनंत भोगले, रामचंद्र जेऊरकर, पन्नालाल गंगवाल, वसंत निंभोरकर, रमणलाल पारीख, सांडू कन्हाळे, दत्ता पाडळकर, मनोहर काटकर, कन्नू गंगापूरवाला, द्वारकादास पटेल, रमेशचंद्र वकील, दिगंबर कुलकर्णी, लक्ष्मण देशपांडे ताडलिंबेकर.
(१२) डावरगाव : राधाकिशन जयस्वाल (प्रमुख), भा. सी. व्याहाळकर, बद्रीनारायण बारवाले.
बीड जिल्हा
(१) खर्डा : प्रमुख : वामनराव गोविंदराव वझे, नामदेव बापूराव खाडे, केशवराव बांगर.
(२) पाथर्डी : प्रमुख : काशीनाथराव जाधव, नारायणराव जुजगर, उद्धवराव गिरी, सोनाजीराव गायकवाड, विठ्ठल काटकर, विठ्ठल बाबरस, आसराजी जाधव, नाथराव पालवे, गणपतराव बढे.
(३) आगळगाव : प्रमुख श्रीनिवास खोत, किशनराव नारायणराव भावठाणकर, दिगंबर हरिभाऊ विर्धे, मुरगप्पा खुमसे, प्रभाकर खेडकर, काशीनाथ मुकद्दम, सुखदेव घुले.
(४) मिरजगाव : प्रमुख : विश्वनाथ भाऊ अजबे, आसराजी जगताप.
(५) डोंगरकिन्ही : प्रमुख : उद्धवराव गिरी, सोनाजी गायकवाड.
(६) बालम टाकळीः प्रमुख डॉ. तु. ना. भोले, अॅड. रामचंद्र देशपांडे.
(७) कडा : प्रमुख : लक्ष्मणराव बापूराव ऊर्फ तात्या धनेश्वर, वसंत गोविंद देशपांडे.
(डोंगरकिन्ही, बालम टाकळी व पाथर्डी हे तीन कॅम्पस् नंतर पाथर्डी कॅम्पमध्येच विलीन झाले.)
जंगल सत्याग्रह
जंगल सत्याग्रह (१४), करोडगिरी नाक्यावर हल्ले (१५), पोलिस ठाण्यावर हल्ले (१६), रझाकार केंद्रावर हल्ले (१७), ग्रामीण सत्ताकेंद्रावर हल्ले (१८)
जंगल सत्याग्रह, करोडगिरीची नाकी, पोलिस ठाणी, रझाकार केंद्रे यावर हल्ले, पाटील - कुलकर्ण्याचे राजीनामे, लेव्ही बंद पाडणे, व गोदामांवर हल्ले हे कार्यक्रम मराठवाडयाच्या पाचही जिल्ह्यांतील सीमावर्ती कॅम्पांनी हाती घेतले. ज्या ज्या गावी ही ऍक्शन झाली व नमूद केलेल्या सत्ता केंद्रांवर हल्ले झाले त्या गावांची जिल्हावर व ऍक्शनवार यादी पुढीलप्रमाणे आहे:
उस्मानाबाद जिल्हा :
इटले, निवळी, माडज, देऊळगाव, सावडी, चिंचोली, चाकूर, काथरी, ढोकरी, रौळगाव, सिंदफळ, आणि सांगवी.
नांदेड जिल्हा :
दाभड, सोनारी, डोलीं, टेळकी, पाटनूर, कोळी, डिघूळ, भोकर, आणि आरंभी मुधोळ, नांदेड, हदगाव, कंधार, बिलोली आणि देगलूर या तालुक्यांतूनही जंगल सत्याग्रह झाले.
परभणी जिल्हा :
महातपुरी, खळी, वझर, पेठशिवणी, सायाळा, (गंगाखेड तालुका), पाळोदी, मानोली (पाथरी ता.), आंबा, पांगरी, यदलापूर, कावजवळा, श्रीधरजवळा, गुळखेड, मोसा, वाई (परतूर), लोहगाव, दातेगाव, शिदगी, हत्ता, सेनगाव, भगवती, नरसी (हिंगोली), बामणी वझर, सावरगाव, अंबरवाडी, तळणी दुधा (जिंतूर), कुर्तडी, आढाव, दाती, पिंपरी, साळवा, वेलधोर, धावडा, कांडली, कोंडूर, दिग्रस, शेवाळा, निशाण, राजदरी, पिंपळदरी, येळेगाव, घोडा तुपा (कळमनुरी व वसमत).
औरंगाबाद जिल्हा :
कोलता टाकळी, लाडसांगवी, कोलता पिंपळगाव (औरंगाबाद व भोकरदन), सिंदखेड, लिंबी, जांब, पिंपरखेड, मूर्ती, कुंभार पिंपळगाव, ठोकळवाडी, तीर्थपुरी, गुंज आणि घाणेगाव.
करोडगिरी नाक्यावर हल्ले
उस्मानाबाद जिल्हा :
मानेगाव, अपसिंगा, माणकेश्वर, वडगाव, तडोळा, ढोकी, खामसवाडी, सातेफळ, गौर, नानज, निपाणी, जेवला, पाचंग्री, दांडेगाव, माळेवाडी, आंतरवाली, पखरूड, पारा, म्हसोबाची वाडी, बोरगाव, वाघोली, शेळगाव, कुनसावळी, वरनाळवाडी, कामी, कोशेगाव, धारूळ, सरसंबा, परसावळी, आळेगा, हिंगलजवळी, सुरडी, बेगडे, भमनापूर, सारोळा आणि मेडशिंगी.
बीड जिल्हा :
चुबळी, धनगरजवळा, काहे गव्हाण, वडझरी, कुरणपिंपरी, बोरगाव, माळेगाव, जळगाव (गायकवाड), महार टाकळी, घुमेगाव, पिंपरी (देशपांडे), कुंडले पारगाव, मायंबा लिमगाव, कडकनाथवाडी, वाघळूज, आणि पाचंग्री.
नांदेड जिल्हा :
दिघी, कामारी, हरडफ, गुरफळी, कौठाळा, नानादेव, करोडी, तळणी.
परभणी जिल्हा :
बेलूर, कापडशिंगी, गंगापूर, गुगुळ, पिंपरी, कडोळी, वाढोना, भगवती, शेगाव, वलाना, येडा, वेलतुरी, केसापुरी, गाडीबोरी.
औरंगाबाद जिल्हा :
नेवरगाव, महमदापूर, सावरखेडा, नागद, पायगव्हाण, सिंदूर वडगाव, मोहलाई, लिगतपुरी, तांदुळवाडी, शेवता, चांगतपुरी, कावसान, गोदेगाव, पौरी, घाटनांदरा, मालेगाव, पिपरी, भायगाव, टुणकी, पानवी, लोणी, नांदगाव, जरंडी, निबायती, माळेगाव पिंपरी, धुळखेडा, केवाली, सोयगाव, पळसखेडा, फर्दापूर, वरखेडी, कंकराळा, वरूड, भामाठाण, जातेगाव, टेंभी.
पोलिस ठाण्यांवर हल्ले
उस्मानाबाद जिल्हा :
नानज, कळंब (आंबा), निपाणी, जेजला, घारापिंपरी, चांदवड, आंतरवाली, वायचाकूर, इटफळ, हिरोळी, बरनाळ, आलूर, हांद्राळ, चिलवडी, आलापी, घारापुरी, मस्ला चौधरी, माना, खांडवी, सेंदरी, खंडेश्वर.
बीड जिल्हा :
मानूर, बर्दापूर, वाशी, वाघळूज, धामणगाव, वेलतुरी, शेरी केरूळ, धुमेगाव, शेकटा.
नांदेड जिल्हा :
पाथरड, हदगाव, मनोला, इस्लापूर, उमरी.
परभणी जिल्हा :
बामणी, शिरड शहापूर, आजेगाव, गोरेगाव, मंठा वापटी, बोरी, कळमनुरी, घोडेगाव, गांजापूर, तळणी, कापडशिंगी
औरंगाबाद जिल्हा :
नागद, पैठण, बिडकिन, पातरूड, बदनापूर, किराणा चावडी (औरंगाबाद शहर) वरूड, नान्हा, मौजपुरी, वैजापूर, सोयगाव, हसनाबाद.
रझाकार केंद्रांवर हल्ले
उस्मानाबाद जिल्हा :
बोरगाव, बोलेगाव, अचलेर, केसेगाव, इटकळ, आलूर, नंदगाव, हांद्राळ, सारोळा, सावंगी खामगाव, दौडपूर, दडफळ, मरसिंगा, चिलवडी, पिंपरी, सुरडी, रूईभर, घाटपिंपरी आणि चांदवड.
बीड जिल्हा :
पाथरवाला, पाडळशिंगी, माळेवाडी, डिघोळ, सोनेगाव, सोने सावरगाव, पिंपळगाव, धुमेगाव, अपसिंगा, वाघळूज, ढाकलगाव, कुर्ला, चिंचाळा.
परभणी जिल्हा :
बामणी, शिरडशहापूर, बलाना, पिंपरी, म्हाळशी, वाघजाळी, आजेगाव, खैरीघुमट, कळमनुरी, मडगाव, वाकोडी, दुधा आणि कानडी.
औरंगाबाद जिल्हा :
जांबगाव, सायखेड, वाहेगाव, देवगाव, भामाठाण, नागद, नागापूर, पिशोर, पळशी, जरूळ, भायेगाव, दऱ्याबाजार, लाडसांवगी, वडोद बाजार, हसनाबाद आणि डोणगाव.